सायरा …. सायरा …सायरा …. ! सायराला श्रद्धा पुनर्वसन केंद्रात दाखल केले आणि मी जेव्हा परत येण्यासाठी निघालो तेव्हा सायरा लोखंडी खिडकीतून मला म्हणाली " तुम वापस नही आओगे…. मुझे पता है ! " ! माझा हुंदका अनावर झाला . मी डोळे पुसत केंद्राबाहेर पडलो . खूप वेळ रडत होतो . मनात आले आपले स्वतःचे असेच पुनर्वसन केंद्र होईल तेव्हा बरा झालेला मनोरुग्ण घरी पाठवताना माझे असेच झाले तर …… ?
सायराला आज-याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करून दोन दिवस उलटले होते . मी श्रद्धाच्या चेतन दिवानांना फोन केल्यावर त्यांनी आईच्या आजारपणामुळे ४ दिवस उशिरा येत असल्याचे सांगितले . मला काहीच कळेना कि सायराला आता पुढील दोन दिवसांसाठी कुठे ठेवायचे ? यावेळी आज-यातील महिला सामाजिक कार्यकर्त्या गीताताई पोतदार यांनी दोन दिवस आपण आपल्या घरी सांभाळतो असे सांगितले . मला त्या क्षणी त्यांचे आभार मानायला शब्दच नव्हते ! हॉस्पिटलबाहेरच्या हॉटेलमधल्या मावशीने सायराच्या सगळ्या हट्टांना न कंटाळता झेलले होते . सायरा परपुरुषाला बघितल्या नंतर खूपच आक्रमक व्हायची . शिव्या द्यायची , थुंकायची . दवाखान्यातून तिच्यासाठी काहीच सहानुभूती मिळत नव्हती . हॉस्पिटलबाहेरच्या हॉटेलमधल्या मावशीकडून मात्र तिला मुलीसारखी माया मिळाली . मी खरंच त्या मावशीचे ऋण विसरू शकत नाही ! तिथून सायाराला समजावून मी व गीताताईने तिच्या घरी आणले . सायरा खूपच आक्रमक बोलायची व वागायची म्हणून गीताताई म्हणाली आज तू इथेच थांब ! हॉस्पिटलमधले दोन दिवस व गीताताईकडे दोन दिवस मी सायराची सोबत सोडली नाही . मी पैशांची मदत मागण्यासाठी जरा बाजूला गेलो कि ती गीताताईला विचारायची " भैय्या कहा गया , भैय्या को बुलाव " ! मग गीताताई मला फोन करून बोलावून घ्यायची . त्यामुळे मला मदत मागायला पूर्ण पाच दिवसांत २ ते ३ तासच मिळाले . गीताताईच्या घरात सायराने स्वतःहून स्वच्छ आंघोळ केली आणि स्वतःचे कपडे धुऊन ताईने दिलेले कपडे घातले . इतक्या दिवसांत घाणीने मळून काळेकुट्ट झालेले कपडे सायराने नजर लागण्याइतके स्वच्छ धुतले होते ! ह्या दोन दिवसांत सायराने गीताताईच्या घरातील वहिपेन घेऊन काही चित्रे काढली होती . त्या चित्रांमधला अर्थही ती सांगत होती ते ऐकून तिच्या संवेदनशील वृत्तीबद्दल कळून आम्ही हतबुद्ध व्हायचो . हॉस्पिटलच्या दारात लावलेल्या फुलाची डहाळी तोडताना पाहून तिने त्याला हटकले होते आणि ती म्हणाली होती कि , " देख उसने फुल तोड …. मेरेको तोडा …. " ! मी हे वाक्य ऐकून स्तंभित झालो ! आजही मला वाटते इतक्या संवेदनशील मनाच्या सायरावर असा प्रसंग येईपर्यंत तिच्याशी वाईट वागणारे किती क्रूर असतील .
शेवटी श्रद्धाचे स्वयंसेवक येण्याचा दिवस उजाडला . बी पेरलेला शेतकरी पावसाची वाट बघतो तसा मी त्यांच्या येण्याची वाट बघत होतो . कारण सायरा आता अधिक आक्रमक होत होती .तिला दिलेल्या गोळ्यांचा तिच्यावर काहीच परिणाम होत नव्हता . आम्ही आता तिच्या ओळखीची व नात्यातली माणसे झालो होतो;त्यामुळे ती खूपच बिनधास्त वागत होती ; टोकाचे बिनधास्त ! गीताताईच्या घरातून पाचव्या दिवशी माझ्या घराकडे तिला आणण्याचे ठरले . मी क्रांतीला बोलावून घेतले . डॉक्टरकडे जायचे आहे असे सांगून तिला आम्ही तिघांनी माझ्या खोलीवर आणले . गीताताई मग तिच्या कामासाठी गेली . क्रांती आणि सायरा दोघी खोलीत थांबल्या आहेत तोवर मी " खान लेके आता हुं " म्हणून सांगून अम्बुलन्स साठी पैशांची मदत गोळा करण्यासाठी बाहेर पडलो. मला इथे हे सांगावेच लागेल कि जर विद्याताई तावडे , गीताताई पोतदार आणि क्रांती कांबळे ह्या तीन स्त्रिया माझ्या मदतीला नसत्या तर मी सायराला उपचारांसाठी दाखल करण्यात यशस्वी झालोच नसतो ! त्यामुळे ह्या तिघींनाही सलाम !
सायराने चिकन खाण्याची व्यक्त केलेली इच्छासुद्धा मी पूर्ण केली . सायराने इतक्या वेळात माझ्या रूममधल्या प्रत्येक वस्तूचा विध्वंस करण्यास सुरुवात केली होती . तिला बहुदा आम्ही तिला कुठेतरी घेऊन जाणार याची कुणकुण लागली होती . संध्याकाळ करून सायराला घेऊन जाण्यासाठी अम्बुलन्स आली .( हि भगवा रक्षक ह्या तरुण मंडळाची अम्बुलन्स मला इतक्या कमी पैशांत मिळण्यासाठी अमोल पारपोलकर ह्या माझ्या मित्राने केलेली मदत विसरता येणार नाही ! आणि भालचंद्र सावंत उर्फ भाऊ आणि विक्रांत वाळके उर्फ पप्पू ह्या दोघांनी ह्या सगळ्या काळात मोलाचे सहकार्य केले ! ) आपण करत असलेले काम आपण एकटे करतच नसतो त्यासाठी खुपश्या गोष्टीं जुळून याव्या लागतात , खुपश्या माणसांची गरज असते . मला ह्या सर्व लोकांनी मदत केल्यामुळे हे सर्व घडून आले .
सायरा अम्बुलन्स मध्ये शांतपणे चढावी म्हणून तीला सरबतातून झोपेच्या गोळ्या दिल्या होत्या तरी सायरा झोपी जात नव्हती . गेल्या ५ दिवसांत मी चहातून , जेवणातून चेतन दिवानांनी सांगितलेल्या गोळ्या दिल्या तरी सायरा ५ मिनिटांसाठीसुद्धा झोपी जात नव्हती !
अम्बुलन्स कर्जतच्या दिशेने निघाली तेव्हा सायराने मला अनेक प्रश्न विचारले कि ' हम कहां जा रहे है ?,तुम मुझे बेचने के लिये ले जा रहे हो क्या ? , मुझे छोड के जाओगे क्या ? ह्या प्रश्नांना मी कशी बशी उत्तरे द्यायचो . प्रवासात सायराने कित्येकदा माझा हात घट्ट पकडला होता . माझ्या खांद्यावर आपले डोके ठेऊन झोपी गेली होती .
सकाळी ६ .३० च्या दरम्यान आम्ही श्रद्धा मध्ये पोहोचलो . तिला दाखल करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केल्या नंतर तिला महिलांच्या वार्डात ठेऊन फ्रेश होण्यासाठी गेस्टरूमकडे गेलो . परत आलो तेव्हा सायरा कुलूप लावलेल्या दरवाजाच्या मागे आपली पिशवी घेऊन उभी होती . मला पाहून मला म्हणाली ' " भैय्या मै मेंटल नहीं हुं , मुझे यहां छोडके मत जाव " ! मी तिला कुठेही जात नाही म्हणून खोटेच सांगितले . तिथल्या एका महिलेला ती सांगत होती कि , ' वो ग्रीन शर्टवाला मेरा भैय्या है , वो मुझे लेके जायेगा ' . तिचे बोलणे मला खूपच भावूक करत होते . मी माझी पिशवी घेतली आणि मी चालू लागलो . माझ्या वाटेवरच्या खिडकीजवळ येउन मला म्हणाली , ' मुझे छोड के कहां जा रहे हो ? मी तिला ' बाजार मे से आता हुं ' अशी थाप मारली . तेव्हा ती मला लगेच म्हणाली , " तुम वापस नाही आओगे , मुझे पता है ……… " ! माझ्या पोटात प्रचंड कालवाकालव झाली , हुंदका दाटून आला . मी जड पायांनी डोळे पुशीत गाडीच्या दिशेने चालू लागलो ……
… आजही सायराची आठवण आली कि माझे डोळे डबडबत आहेत …. !

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा